सांगोला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांची इंडसइंड बँकेला क्षेत्रभेट
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला दिनांक 11 मे 2023 रोजी सांगोला महाविद्यालय, सांगोला येथील
अर्थशास्त्र विभागाने इंडसइंड बँक, शाखा-सांगोला येथे क्षेत्र भेट दिली.
इंडसइंड बँकेचे शाखा अधिकारी श्री दुर्गाप्रसाद जोशी यांनी बँकेला भेट देऊन तिथली माहिती
विद्यार्थ्यांना देण्याबद्दल परवानगी दिली. इंडसइंड बँकेचे उपशाखा अधिकारी श्री. अमृतसिंह देशमुख
यांनी बँकेतील आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने केले जातात आणि बँकेतील सर्व विभागांची रचना व
कार्यपद्धती इत्यादी विद्यार्थ्यांना सांगताना, बिगिनिंग ऑफ द डे आणि एन्ड ऑफ द डे या दोन्ही
मधील सर्व कार्य व कार्यपद्धती, बँक क्षेत्रात केला जाणारा माहिती तंत्रज्ञानाचा वापर तसेच ग्राहकांचे
असणारे अधिकार याविषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कॅशियर श्री सोमनाथ बिराजदार यांनी
चेक ट्रांजेक्शन,एनईएफटी, आरटीजीएस याविषयीची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दिली.
तसेच या बँकेतील कृषी कर्ज अधिकारी श्री सतीश जाधव यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या देण्या
घेण्याचे व्यवहार प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील
परीक्षांविषयीची माहिती देऊन करिअरच्या संधी व बँक क्षेत्राचे असणारे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून
दिले.
या क्षेत्रभेटीचे मार्गदर्शन मार्ग व नियोजन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका सौ सोनल
भुंजे (गुळमिरे) यांनी केले. या क्षेत्रभेटीच्या प्रसंगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील प्रा.
वाघमारे, प्रा. गोडसे, प्रा. डॉ. बाबर, प्रा. डॉ. वेदपाठक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या सदिच्छा
भेटी प्रसंगी इंडसइंड बँकेतील प्रशासकीय वर्ग व सिक्युरिटी गार्ड यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व
सहकार्य लाभल्याबद्दल प्राध्यापिका सौ सोनल भुंजे (गुळमिरे) यांनी आभार मानले.