सांगोला तालुका

भाग्योदय अर्बन को.ऑ.सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. हरी मेटकरी  तर व्हा.चेअरमनपदी श्री.पांडुरंग देशमुख

सांगोला(प्रतिनिधी):-भाग्योदय अर्बन को. ऑप. क्रे..सो. लि. सांगोला संस्थेच्या चेअरमनपदी श्री. हरी बंडा मेटकरी यांची  व्हा.चेअरमनपदी श्री.पांडुरंग सदाशिव देशमुख यांची निवड करण्यात आली.
भाग्योदय अर्बन को. ऑप. क्रे..सो. लि. सांगोला  संस्थेचा संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्या अनुषंगाने काल बुधवार दि.17/05/2023 रोजी संखेच्या कार्यालयात चेअरमन व व्हा.चेअरमन पदाच्या निवडीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. शेख व त्यांचे सहकारी श्री.विलास घोडके यांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रक्रियेमध्ये चेअरमन पदासाठी श्री.हरी बंडा मेटकरी  तर व्हा.चेअरमन पदासाठी श्री.पांडुरंग सदाशिव देशमुख यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे चेअरमनपदी श्री.हरी बंडा मेटकरी तर व्हाईस चेअरमनपदी श्री.पांडुरंग सदाशिव देशमुख यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. शेख यांनी जाहीर केले.पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच नुतन संचालकपदी श्री. पोपट संदीपान जानकर, श्री. हरीदास मारुती येडगे, श्री.बंडोपंत रामचंद्र वाघमोडे, श्री. आदम सलिम मुलाणी, श्री.जालींदर सुखदेव पारसे, श्री. कामाजी बिरा नायकुडे, सौ. भारती दगडू वाघमोडे, श्रीमती. संगीता पांडुरंग बंडगर यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.  या सभेसाठी श्री.ढेरे वकील  तसेच अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वांचा सत्कार करून त्यांच्या भावी कार्याय शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!