सांगोला तालुका

गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुका स्तरीय भरारी पथकाची स्थापना- कृषी अधिकारी शिवाजी शिंदे ; सांगोला तालुक्यामध्ये पेरणीपुर्व मशागतीची कामे सुरु

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यामध्ये पेरणीपुर्व मशागतीची कामे सुरु आहेत. सांगोला तालूक्याचे सरासरी खरिप क्षेत्र 22719 हेक्टर असुन सन 2021 खरिप मध्ये 29848 हेक्टर क्षेत्रावर व गत वर्षी सन 2022 मध्ये 31952 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. येणार्‍या 2023 च्या खरिप हंगामामध्ये 40325 हेक्टर वर खरिपाची पेरणी अपेक्षित आहे व त्याचे नियोजन कृषि विभागाने केले आहे

.
खरिप 2023 प्रस्तावित क्षेत्र पिक निहाय पुढीलप्रमाणे-बाजरी- 15000 हे, मका- 17500 हे, सुर्यफुल -4250 हे, तुर-1250 हे, उडिद-600 हे, मुग- 400 हे, भुईमुग – 500 हे , सोयाबिन – 300 हे, कापुस – 400 हे, मटकी- 125 हे ,एकुण- 40325 हे.

तालुक्यासाठी या वर्षी खरिपासाठी 15826 मे.टन रासायनिक खताचे आवंटन मंजुर झाले आहे. खत निहाय मंजुर आवंटन पुढीलप्रमाणे-युरिया- 5947 मे टन, एस.एस.पी.- 2146 मे टन, एम.ओ.पी.- 999 मे टन, डि.ए.पी.- 1757 मे टन, एन.पि.के.- 4977 मे टन

गुणवत्ता नियंत्रणासाठी तालुका स्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तक्रार निवारणासाठी तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी आधिकृत दुकानदाराकडुनच बियाणे खते व किटकनाशके खरेदी करावेत. दुकानदाराकडुन पक्के बिल घ्यावे. बॅग वरिल किंमतीपेक्षा जादा रक्कम देऊ नये. बियाणे बग व लेबल जपुन ठेवावे. शेतकर्‍यांनी बिजप्रक्रिया करूनच बियाणाची पेरणी करावी. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्यवरच म्हणजे 80-100 मिमी पाऊस झाल्यवरच पेरणी करावी. बियाणे/खते/किटकनाशके बाबत काही अडचण आल्यास कृषि विभागाशी संपर्क साधावा.असे आवाहन कृषि विभागाकडुन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!