सांगोला तालुका

*एसटी प्रवासादरम्यान महिलेचे 90 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास

सांगोला (तालुका प्रतिनिधी) एस टी प्रवासात पंढरपूर, खर्डी, सांगोला दरम्यान अज्ञात दोन महिलांनी महिला प्रवाशाच्या बॅगेतील सुमारे चार तोळ्यांचे 90 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवार दि. 13 डिसेंबर रोजी घडली आहे.
मनिषा अनिल गोटे वय 45 वर्षे रा.अनगर ता. मोहोळ जि.सोलापूर या मंगळवार रोजी मोहोळ येथे एसटी स्टॅन्डवरून सोलापुर कोल्हापुर या एसटी बस मधे बसून पंढरपुर मार्गे खर्डी ता पंढरपुर येथे आले नंतर एस टी बंद पडली , तेव्हा अर्ध्या तासाने एसटी कंन्डाक्टरने सांगोला पर्यंत जाणारे प्रवाशी दुसऱ्या एसटी मध्ये बसविले मनीषा गोटे यांना जवळच उतरायचे असल्याने दवाजातील कंडाक्टरचे सिट जवळ प्रवाशी समान सोबत ठेवून बसल्या एसटीतील दरवाजाजवळ उभे असलेल्या तीन बायका होत्या दरम्यान एसटी दुपारी 4 वा.चे सुमारास एसटी पुढे निघाल्यानंतर एसटी मध्ये धक्का मारून पुढे गेल्या होत्या मनीषा गोटे या सांगोला येथील पंचायत समिती समोर उतरल्या घरी गेल्यानंतर बॅगेतील दागिने पाहिले असता ते दिसून आले नाहीत म्हणून नजरचुकीने घरी राहिले का याची चौकशी केली असता घरीही दागिने नसल्याचे घराकडील लोकांनी सांगितले त्यामुळे यांची खात्री झाली की अज्ञात तीन महिला पैकी दोन महिलांनी बॅगेतील दागिने चोरून नेले आहेत याबाबत मनीषा गोटे यांनी अज्ञात दोन महिला विरुद्ध ९० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याबाबत फिर्याद दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!