सांगोला येथे सोमवारी मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी):- सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या सहकार्याने सिव्हील इंजिनिअर्स असोसिएशन सांगोला, रोटरी क्लब ऑफ सांगोला,शिवप्रेमी मंडळ सांगोला,आपुलकी प्रतिष्ठान ,सांगोला मेडिकल असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सांगोला,सर्व पत्रकार संघटना,शहीद जवान बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 31 मार्च 2025 रोजी मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल,मिरज रोड सांगोला येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत करण्यात आले असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन सांगोलाचे अध्यक्ष रो. इंजि.संतोष भोसले,रोटरी क्लब सांगोलाचे अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे व संयोजकांच्या वतीने देण्यात आली. सदरचे शिबिरासाठी सांगोल्याचे सुपुत्र हृदयरोग तज्ञ डॉक्टर प्रदीप भगवान देवकते यांचे सहकार्य लाभले.
या महाआरोग्य तपासणी शिबिरामध्ये हृदयरोग विभाग,हाडांचा विभाग,डोळ्यांचा विभाग,जनरल मेडिसिन विभाग,मूत्ररोग विभाग, कान,नाक व घसा विभाग असे वेगवेगळे विभाग करण्यात आले आहेत. हृदयरोग विभागांमध्ये हृदयाची प्राथमिक तपासणी मोफत इसीजी इको मोफत अँजिओग्राफी मोफत एन्जोप्लास्टी, मोफत बायपास सर्जरी तपासणी करण्यात येणार आहे..हाडांच्या विभागामध्ये हाडांची मोफत तपासणी,मोफत मणक्यांची प्राथमिक तपासणी, गुडघा व खांदा बदलण्याची सोय, एक्सरे ची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
डोळ्यांच्या विभागांमध्ये मोफत डोळे तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणावर उपचार करण्यात येणार आहेत.जनरल मेडिसिन विभागामध्ये रुग्णाची मोफत तपासणी मधुमेह व रक्तदाब वाढणे यावर उपचार तसेच डेंगू,चिकनगुनिया इत्यादी साथीच्या रोगावर उपचार करण्यात येणार आहेत.मूत्ररोग विभागांमध्ये मोफत ओपीडी सोय असून प्रयोगशाळेतील प्राथमिक तपासणीसाठी सवलत व हॉस्पिटलमधील तपासणिसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे.
कान,नाक व घसा विभागामध्ये मोफत नाक ,कान,घसा यांची प्राथमिक तपासणी,नाकातील हाड वाढणे यावर शस्त्रक्रिया,कानाच्या पडद्याला होल असणे अथवा सुजणे यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
सांगोला शहर विभागाच्या नाव नोंदणीसाठी डॉ.शैलेश डोंबे,डॉ.विजय इंगोले,डॉ.दत्तात्रय इंगोले,डॉ.शिवराज भोसले,डॉ.संतोष पिसे,डॉ.महेश राऊत यांच्याशी संपर्क साधावा.महूद विभागासाठी डॉ.रमेश सीद,,डॉ.शरद नागणे मेडशिंगी विभागासाठी डॉ.कृष्णदेव शेंडे,डॉ. प्रमोद जाधव यांच्याशी संपर्क साधावा. जवळा विभागासाठी डॉ.विजय काशिद, डॉ.निलेश इंगवले, डॉ.सोमनाथ म्हेत्रे, डॉ..एम.एम.नदाफ यांच्याशी संपर्क साधावा. कोळा विभागासाठी डॉ.सादिक पटेल, डॉ.महादेव पांढरे, डॉ.शरद जाधव, डॉ.औदुंबर कुंभार यांच्याशी संपर्क साधावा. जुनोनी विभागासाठी डॉ.महेश कोरे, डॉ.विजय व्हनमाने यांच्याशी संपर्क साधावा. नाझरा विभागासाठी डॉ.कन्हैया सोनवणे, डॉ.सौ.चंद्रकला बाबर, डॉ.अर्जुन दबडे, डॉ.विकास कवडे यांच्याशी संपर्क साधावा. अकोला विभागासाठी डॉ.जयंत केदार, डॉ.सचिन लिगाडे, डॉ.महेश लिगाडे, डॉ.अतुल खटकाळे यांच्याशी संपर्क साधावा.
शिबिरासाठी येणार्या रुग्णांसाठी सांगोला एसटी स्टँड पासून सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला येथे जाण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे.या शिबिरामध्ये भाग घेतलेल्या गरजू लाभार्थी रुग्णाला पुढील उपचारासाठी विविध शासकीय योजनेअंतर्गत फायदे देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मोफत महा आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचा सांगोला तालुका व शहर परिसरातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



