सांगोला येथे व्यापारी संकुल बांधण्याच्या कामाला नगरविकास विभागाकडून दहा कोटी रुपये निधी मंजूर -आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला नगरपरिषद हद्दीमध्ये आरक्षण क्रमांक ३१ त्रिमूर्ती टॉकीज समोर व्यापारी संकुल बांधणे या कामासाठी महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
चालू पावसाळी अधिवेशनामध्ये मागणी केल्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला नगरपरिषदेसाठी १०कोटी रुपये निधी मंजूर केला आहे या चालू अधिवेशनातून सार्वजनिक बांधकाम खात्याकडूनही ३५कोटीचा निधी मंजूर झाला आहे सांगोला मतदार संघासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला असल्याने सांगोला शहरासह ग्रामीण ग्रामीण भागाचा ही विकास होणार आहे.
या मंजूर निधीतून सांगोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी व्यापारी संकुलाचे बांधकाम होणार असल्याने सांगोला शहराच्या विकासामध्ये अधिकची भर पडणार आहे सदरच्या कामाचे निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत असे यावेळी बोलताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले