खारवटवाडी विकास फौंडेशन च्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

नव्यानेच स्थापन झालेल्या खारवटवाडी विकास फौंडेशन च्या वतीने प्राथमिक शाळा खारवटवाडी आणि प्राथमिक शाळा ,इंगोलेवस्ती येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले..विद्यार्थ्या मध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या अनुशेषांगाने वेगवेगळे साहित्य जसे डिजिटल पाटी, वही,पेन, पेन्सिल बॉक्स, स्केच पेन बॉक्स, रबर, इरेजर, ड्रॉइंग बुक इत्यादी चे किट तयार करून मराठी शाळेमध्ये वाटप करण्यात आले .
या कार्यक्रम प्रसंगी श्री नितीन (आबासाहेब ) इंगोले यांनी मनोगत व्यक्त केले .प्रसंगी बोलताना त्यांनी खारवटवाडी विकास फौंडेशन चे विविध कामाचे स्वरूप ,ध्येय ,धोरणे इत्यादी विषयी माहिती दिली .खारवटवाडी ता. सांगोला जि. सोलापूर या आपल्या कर्मभूमीतील सुशिक्षित तरूणांनी जसे कि प्रशासकीय अधिकारी,बँकर,डॉक्टर, प्राध्यापक/शिक्षक , सैन्य दलातील मेजर,, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक इ. सर्वांनी एकत्र येण्याची असून, आपल्या पुढच्या पिढीच्या विकास साठी व्यासपीठ/सामाजिक संघटना असणे जरुरीचे आहे. सदर संस्थे द्वारे आपल्या भागामध्ये वृक्षारोपण व पर्यावरण विषयक कामे, गरजू विद्यार्थी यांना मदत, गुणवंत विद्यार्थी सत्कार,ग्रंथालय व अभ्यासिकेची निर्मिती या व्यतिरिक्त जलसंधारण, आरोग्य, शेतीविषयक मार्गदर्शन अशीविविध विधायक कामे करून सामाजिक उत्तरदायित्व निभावावे ह्या हेतूने आपण सर्वांनी संस्थेची निर्मिती केली असे नमूद केले ..
या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित डॉ दत्तात्रय भगवान इंगोले यांनी बोलताना सांगितले कि ज्या आपण ज्या शाळेत शिकलो ,घडलो ,त्याच शाळेतील येणारी पिढी पण घडली पाहिजे आणि विद्यार्थी मित्रा मध्ये गुणात्मक वाढ झाली पाहिजे या उद्देशाने आजचा कार्यक्रम चे नियोजन केले आहे.त्यामध्ये फौंडेशन चे सगळे सदस्य अगदी मनापासून सामाजिक कार्यात सहभागी आहेत त्याबद्दल आनंद व्यक्त केला ..
तसेच या कार्यक्रम प्रसंगी बोलताना कुमार भाऊ ढोले म्हणाले कि विकास फौंडेशन ने हाती घेतलेला सामाजिक हा काहीतरी वेगळा,नाविन्यपूर्ण आहे आणि आनंददायी आहे अशी भावना व्यक्त केली .या कार्यक्रम साठी श्री सुधीर सुरवसे ,श्री चंद्रकांत खडतरे ,श्री प्रशांत खाडे ,श्री किरण सुरवसे ,श्री संदीप केदार ,समाधान इंगोले, वैभव इंगोले, भिमराव इंगोले, प्रभाकर इंगोले, अर्जुन गेजगे, मोहीत केदार ,इंगोले वस्ती शाळेचे मुख्याध्यापक मा.आवताडे सर व निकम मॅडम व खारवटवाडी शाळेचे मुख्याध्यापक मा. बागवान सर व पाटील मॅडम यांनी आभार व्यक्त केले व खारवटवाडी विकास फाॏंडेशन च्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.