अवैध सावकारीबाबत सांगोला शहरात तीन ठिकाणी धाड.
सांगोला(प्रतिनिधी):-सांगोला तालुक्यातील बस स्टॅण्ड शेजारी वासुद रोड, ता. सांगोला येथील रहिवाशी श्री.गौरव सुनिल चांडोले व श्रीमती राधा सुनिल चांडोले व इतर हे व्याजाने रक्कम देऊन त्याबदल्यात भरमसाठ व्याज आकारणी करतात. पैसे न आल्यास चेक बाऊन्स करून कोर्टात केस केली बाबत श्री. रोमीत बबनराव पाटील व आनंद दत्तात्रय दौंडे दोघे रा. सांगोला यांची तक्रार प्राप्त झाल्याने सांगोला तालुक्याचे सावकारांचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था सांगोला, जि. सोलापूर श्री.पी. आर. नालवार यांचे पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत श्री. गौरव चांडोले व श्रीमती राधा चांडोले यांचे राहते घरावर व इतर दोन सावकारांवर दि.21/07/2023 रोजी दुपारी 2 वा. असे तीन ठिकाणी धाड टाकून श्री.गौरव चांडोले व श्रीमती राधा चांडोले सावकारी कर्जाबाबत नोंदी असलेले रजिस्टर्स – 04, कोरे चेक- 18, कोरे बॉन्ड 03 व उसनवारी करार पत्र इ. कागदपत्रे जप्त केले असून त्याबाबत सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. इतर व्यक्तीच्या घरावर धाड टाकण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी अवैध सावकारीस आळा घालण्या संदर्भात बैठक घेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार मा.जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर श्री.किरण गायकवाड यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईस पथक प्रमुख श्री.एस.एस. सांगोलकर तर पथकातील इतर सदस्य म्हणून श्री.डी.पी. सुरवसे, श्री. व्ही.जे.वडतीले यांनी कामकाज पाहिले. सदर कामी कार्यालयाच्या वतीन श्री.अ.अ. शेख यांनी नियोजनबध्द कामकाज व पत्रव्यवहार केला
सदर कारवाईप्रसंगी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री. अनंत कुलकर्णी यांचे नेतृत्वाखालील पोलीस पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.