राजकीय

मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी;   अपवादात्मक परिस्थितीत दोन तासांची सवलत

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाच्या 7 मे 2024  या मतदानाच्या दिवशी एकही कामगार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत ज्या औद्योगिक संस्था, कंपनी बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होत असेल, तेथील कामगारांना मतदान करण्यासाठी दोन ते तीन तासांसाठी सुट्टी देणे संबंधितांना बंधनकारक असल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त सु.म गायकवाड यांनी दिली आहे.
                  महाराष्ट्र शासनाचे उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, शासन निर्णय 5 एप्रिल 2024 अन्वये निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी सर्व दुकाने, आस्थापना, व्यापारी संस्था, हॉटेल, रेस्टारन्ट, नाट्यगृहे, औद्योगिक उपक्रम, कारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापना यांच्या व्यवस्थापक मालकांना सुट्टी देणे बंधनकारक आहे.
             अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल, कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांना घेणे आवश्यक राहील,
          जिल्ह्यातील कामगारांकरीता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय स्तरावर दक्षता कक्ष स्थापन करण्यात आले असून कामगारांना मतदानाकरीता सुट्टी अथवा दोन तासांची सवलत आस्थापना मालक देत नसल्यास कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 0217-2728401 तसेच भ्रमणध्वनी क्र. 9822494865 वर संपर्क साधून तक्रार देण्यात यावी. असे आवाहनही सहायक कामगार आयुक्त श्री. गायकवाड यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!