sangola
जि. प. प्राथ. शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेमध्ये शिक्षण सप्ताह दिवस सहावा आनंददायी वातावरणात साजरा
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 21 जुलै ते 28 जुलै दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आले आहेत.जि. प. प्राथ शाळा मुजावर पिरजादेवस्ती शाळेत मोठ्या उत्साहात शिक्षण सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. दिवस सहावा इको क्लब हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात अंतर्गत शाळेत इको क्लब स्थापन करण्यात आले. मुलांना पर्यावरणाच्या येणाऱ्या समस्या त्यासाठी आपण काय करावे सांगण्यात आले. वृक्षारोपणाचे महत्व, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा काटकसरीने वापर, पर्यावरण संतुलन इत्यादी विषयी चर्चा करण्यात आली. तसेच शाळेतील बालकांच्या मातांना बोलवून वृक्षारोपण करण्यात आले. त्या रोपांना त्या बालकाचे व त्याच्या आईचे नाव देणे व त्या मुलाने त्या रोपाचे संवर्धन करावे असे सांगण्यात आले. आनंदादाई शनिवार अंतर्गत यशोगाथा – बेस्ट प्रॅक्टिसेस हा कार्यक्रम मुलांना दाखवण्यात आला. असे उपक्रम घेण्यात आले.
या उपक्रमात मुलांनी व मातांनी अतिशय उत्साहाने सर्व उपक्रमात सहभाग घेतला. सर्व मुले खुप उत्साहाने सर्व उपक्रमात सहभागी झाले.त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला व चैतन्यमय व आनंददायी वातावरणात दिवस साजरा करण्यात आला.त्यासाठी केंद्रप्रमुख सौ. जाधव मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच मुख्याध्यापिका श्रीमती.जिरगे मॅडम व उपशिक्षिका सौ. पिरजादे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.