crime

मागील 15 महिन्यापुर्वीच्या खुनाचा पोलीसांकडून उलगडा; सांगोला तालुक्यातील घटना

HTML img Tag Simply Easy Learning    

 

सांगोला(प्रतिनिधी):-मागील 15 महिन्यापुर्वी अज्ञात आरोपीने, अज्ञात इसमाचा, अज्ञात कारणाने खुन करुन त्याचे प्रेत 100 टक्के जाळुन ओळख संपविलेली असता सोलापुर शहर आणि सोलापुर ग्रामीण कडील पथकांनी कसोसीने समांतर तपास करुन गुन्हयातील मयताची ओळख पटवुन आरोपीस अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी दिली.

आरोपी विशाल बनसोडे (वय 36 वर्षे, रा सावित्रीबाई फुले हौसींग सोसायटी, संभाजीपुर, नांदणी रोड, जयसिंगपुर ता.शिरोळ जि कोल्हापुर) यास अटक करुन दिनांक 27 जुलै 2024 रोजी मा.न्यायालयासमक्ष हजर केले असता मा.न्यायालयाने त्यास दिनांक 03 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर करण्यात आला आहे.

सांगोला तालुक्यातील मौजे अनकढाळ गावाचे शिवारात नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणारे रस्त्यापासुन पुर्व बाजुला असलेल्या कुटे मळयाकडे जाणारे कच्च्या रस्त्याचे उत्तरेस, नाला बल्डींगच्या बांधालगतच्या वारीत लिंगे यांचे शेतामध्ये अंदाजे 25 ते 30 वर्षे वयाचा इसम जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. सदर इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने, अज्ञात कारणावरून जिवे ठार मारून अंगावर काहीतरी ओतुन पेटवून देवुन पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणुन मौजे अनकढाळ येथील बाळासो पाटील यांनी फिर्यादी जबाबावरून दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी 02:26 वा सांगोला पोलीस ठाणे गु र नं 326/2023 भादवि कलम 302, 201 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विक्रांत गायकवाड हे करीत आहेत. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे सोलापुर शहर येथे यातील मयताच्या वर्णनाचा इसम मिसींग झाल्याबाबत मिसींग क्रमांक 36/2023 दिनांक 11 एप्रिल 2023 प्रमाणे दाखल असलेल्या प्रकरणाचा तपास सोलापुर शहर कडील करीत होते. त्याप्रमाणे रमन साबळे (वय 36 वर्षे, रा. 151 लक्ष्मी पेठ, देगाव रोड सोलापुर) याचे मिसींग बाबत समांतर तपास करीत असताना, त्याचा खुन मिसींग व्यक्तीचा व्यवसायीक भागीदार विशाल बनसोडे याने केल्याची माहिती मिळालेने त्यास कोल्हापुर येथुन 5.30 वा ताब्यात घेवुन मिसींग व्यक्तीबाबत त्याचेकडे सखोल चौकशी केली असता, विशाल बनसोडे याने दिनांक 11 एप्रिल 2023 चे रात्री अनकढाळ टोल नाक्याजवळ त्या दोघांमध्ये पैशाचे देवाण घेवाणीचे कारणावरून वाद झाला. त्यातुन त्याने रमन साबळे यास मारहाण करून गळा दाबुन खुन केला. त्यानंतर पेट्रोल व डीझेल आणुन मयत रमन साबळे याचे शरीरावर टाकुन त्याचे शरीर ओळखु येवु नये याकरीता जाळून टाकले असल्याचे सांगितले आहे.

याबाबत सांगोला पोलीस ठाणेच्या अभिलेखावर अज्ञात आरोपीविरुध्द खुन करुन पुरावा नाहीसा केल्याचा गंभीर गुन्हा दाखल असल्याने सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपी नामें विशाल बनसोडे यास सपोनि संदीप पाटिल गुन्हे शाखा सोलापुर व त्यांचे कडील तपास पथकाने सांगोला पोलीस ठाणे येथे समक्ष हजर केल्याने त्यास सांगोला पोलीस ठाणे कडील गु र नं 326/2023 भादवि कलम 302, 201 या गुन्हयात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक 26 जुलै 2024 रोजी 11 वाजता सदर नमुद गुन्हयात अटक करण्यात आली.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.शिरिष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे, सपोनि.सचिन जगताप व तपास पथक तसेच सोलापुर शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखा सोलापुर यांचेकडील सपोनि संदिप पाटील व तपास पथक यांनी केली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!