sangola

फॅबटेक मध्ये शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी या विषयावर ऑनलाईन वेबिनार संपन्न

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला : येथील फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च मध्ये गुरुवार दि. २५ जुलै रोजी शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी या विषयावर उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे यांनी दिली.

शिक्षण सर्वांसाठी, समृद्ध महाराष्ट्रासाठी या विषयावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या वेबिनार मध्ये बोलताना ना.पाटील यांनी ज्या मुलींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या  आर्थिक दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या मुलींना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग या विभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या १०० टक्के मोफत लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे, असे सांगितले आहे.

हा ऑनलाईन वेबिनार फॅबटेकचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक मा.श्री.दिनेश रूपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे, प्राचार्य डॉ.रविंद्र शेंडगे, डीन अँकँडमीक डॉ. वागीशा माथाडा व सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी हे या ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमासाठी उपस्थितीत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!