sangola

फॅबटेक औषधनिर्माणशास्त्र अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

HTML img Tag Simply Easy Learning    

      सांगोला येथील फॅबटेक शिक्षण संस्था संचलित फॅबटेक औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ मध्ये प्रवेश घेतलेल्या चौथे वर्ष आठव्या  सत्रातील विद्यार्थ्यांची उन्हाळी परीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांचे तर्फे मे – २०२४ मध्ये घेण्यात आली होती सदरील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात रेश्मा अंकुश मुळे ही विद्यार्थिनी ८.७३ एस जी पी ए सह प्रथम क्रमांक, पद्मावती महादेव हत्तळी ८.६४ एस जी पी ए सह व्दितीय क्रमांक तर प्रतीक्षा श्रीकांत येलपले, प्रियांका श्रीशैल गोडसे, ऋतुजा अशोक गवळी, शुभांगी हणमंत पाटील या चौघी ८.४५ एस जी पी ए सह तृतीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाल्या आहेत.

      विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. भाऊसाहेब रुपनर, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर व परिसर संचालक डॉ. संजय आदाटे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!