ग्रामीण भागात आखाडी यात्रा जोर धरू लागल्या….
कोळा / वार्ताहर :-सध्या आषाढ महिना सुरू असल्याने ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही आखाडीसाठी पंगती रंगू लागल्या असून, ऐन पावसाळ्यात या आखाड्या जत्रा जोरात सुरू आहेत. ग्रामीण भागातील आठवडे बाजारात काळ्या अन् ‘उलट्या पिसां’च्या कोंबड्यांचा भाव भलताच वधारला आहे. एरव्ही चारशे-पाचशे रुपयांना मिळणाऱ्या सर्वसाधारण काळ्या कोंबडीसाठी चक्क ६०० ते ७०० रुपये मोजावे लागत आहेत.पावसाची रिपरिप व थंड हवामान गारठा ह्यामुळे या आखाडी यात्रा ना चांगलाच रंग चढू लागला आहे.एखाद्या झाडाखाली अथवा देवळाजवळ निवारा पाहून देवाच्या नावाखाली सर्रास पंगती झडू लागल्या आहेत.
कोळा कोंबडवाडी कराडवाडी जुनोनी गोडवाडी सोमेवाडी जुजारपूर डोंगर पाचेगाव किडबिसरी परिसरात शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी पेरण्या उरकलेल्या आहेत. पिकांची उगवण ही समाधानकारक आहे.पावसाची संततधार सुरू असल्याने शेतातही कामे चालेनाशी झाली आहेत.या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी वर्गासह अनेकांनी घरीच राहणे पसंत केले आहे. आषाढातील ‘देणगती’ महिन्यातील पहिल्या रविवारपासून सुरू झाल्या आहेत. बहुतेक ग्रामस्थ श्रावण ‘पाळत’ असल्याने पूर्व परंपरेने या श्रावण महिन्याचा बॅक लॉक भरून काढण्यासाठी पूर्वजांनी आषाढ हा महिना निवडला गेला आहे. तीच पद्धत आजही रूढ झाली आहे.कधी आखाडी महिना लागतो याकडे अनेक खवैय्यांचे डोळे लागलेले असतात.गेली तीन आठवडे सवड मिळेल, त्याप्रमाणे या आखाडी जत्रा सुरू आहेत. गावोगावी मांसाहारी जेवणांचा घमघमाट सुटत आहे.सोमवार व शनिवार वगळता इतर पाच ही दिवस या यात्रांना जोर चढू लागला आहे.
मोठ्या प्रमाणावर चाललेल्या या आकाडी यात्रांमुळे आठवडे बाजारात कोंबड्या- बकऱ्यांचे दर वाढले आहेत. तीनशे रुपयांपर्यंत मिळणारा कोंबडा आता ६०० ते ८००रुपयांपर्यंत गेला आहे, तर आठ- दहा किलोचे बकरे नऊ हजारापर्यंत विकले जात आहे. कोंबडीची २०/२५ रुपयांना मिळणारी पिले आता मालक ४५/५० रुपयांपर्यंत किमती सांगत आहेत. परिसरातील कोंबड्या बकऱ्यांचे बाजार ‘फुल्ल’ चालले आहेत. आषाढातील देणगतीतही बऱ्याच तऱ्हा आषाढातील या देणगतीतही बऱ्याच तऱ्हा आहेत. अंधश्रद्धा एच्या नावाखाली बुरसटलेले काहीजण काही भुताखेतांना, देवांना कोंबडा-कोंबडी ही काळ्या रंगाचीच लागते, तर काही देणगतींना उलट्या पिसांची कोंबडी हवी असते. काळ्या रंगाच्या कोंबड्यांना इतर कोंबड्यांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत, तर उलट्या पिसांच्या कोंबड्या अभावानेच असल्याने संबंधित मालक ग्राहकांची नड पाहून मनाला येईल तो दर सांगत आहेत. किलोभरही वजन नसणाऱ्या अशा कोंबड्यासाठी सध्या ५०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहे. मात्र, पैसे कितीही मोजावे लागले तरी नागरिक त्यात कमी पडत नाहीत. मोठ्या हौसेने या यात्रा करत आहेत. गावोगावी या आखाडी जोरात सुरू आहेत.