सांगोला तालुकाक्रीडामहाराष्ट्र

देवा स्पोर्ट्स क्लब सांगोला संघाने पटकावला आर.सी.सी.चषक 

सांगोल्यात रंगला डे - नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार

सांगोला (तालुका प्रतिनिधी): छ.शिवाजीनगर गणेश उत्सव मंडळ, चेतनसिंह केदार-सावंत मित्रपरिवार व आर. सी. सी. क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुका मर्यादित भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देवा स्पोर्ट्स क्लब सांगोला संघाने जय शिवराय संघांचा ५ विकेटने पराभव करून आर.सी.सी.चषक पटकाविला. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप यांच्या हस्ते विजेत्या देवा स्पोर्ट्स संघाला २ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस व चषक तर उपविजेत्या जय शिवराय संघाला १ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस व चषक  देण्यात आला.
      माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड, शेकापचे डॉ.अनिकेत देशमुख, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अनिलनाना खटकाळे, नाथा जाधव, माजी नगरसेवक आनंदा माने, सागर पाटील, लतिफ तांबोळी, भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, वासूदचे उपसरपंच अनिल (बंडू) केदार, पुण्यवंत खटकाळे, फलटणचे नगरसेवक अशोक जाधव, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, भाजप माढा ओबीसी तालुकाध्यक्ष निवृत्ती कांबळे, राजाभाऊ जगदाळे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, प्रकाश घाडगे, जालिंदर पानसरे, गजानन भाकरे, विष्णुपंत केदार, ऋषिकेश धायगुडे, अनिल चव्हाण, प्रा.संजय देशमुख, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, वसंत सुपेकर,  संजय गंभिरे, मानस कमलापुरकर, एन.वाय.भोसले, दुर्योधन हिप्परकर, संजय केदार, राजू शिंदे, प्रवीण जानकर, दिलीप सावंत आदी उपस्थित होते.
      छ.शिवाजीनगर गणेश उत्सव मंडळ, चेतनसिंह केदार-सावंत मित्रपरिवार व आर. सी. सी. क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला तालुका मर्यादित भव्य डे – नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेत तृतीय बक्षीस शिवसंग्राम क्रिकेट क्लब कडलास संघाला ७५ हजार रुपये व चषक, चतुर्थ बक्षीस डिकसळ फायटर डिकसळ संघाला ५० हजार रुपये व चषक देण्यात आला. मॅच ऑफ द सिरीज अजय साळुंखे (डिकसळ फायटर डिकसळ), फायनल मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच आयुब शेख, ऑरेंज कॅप अजय माने कडलास, पर्पल कॅप प्रशांत काशीद सांगोला तर आशुतोष केदार यांना शतकविर बक्षीस देण्यात आले.
     अंतिम सामन्यात जय शिवराय सांगोला संघांने आठ ओव्हरमध्ये ७७ धावा काढल्या. धावांचा पाठलाग करताना देवा स्पोर्ट्स संघाने ६ ओव्हरमध्ये ८१ धावा काढून आर.सी.सी. चषक पटकाविला. देवा स्पोर्ट्सच्या आयुष शेख याने एकाच ओव्हरमध्ये सलग सहा षटकार मारून संघाला विजयी केले. सदरच्या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी किरण चव्हाण, राजू शिंदे, पिंटू शिंदे, इनुस नदाफ, विनोद काटकर, अक्षय जाधव, चिवळ्या कोळी, श्याम माळी, सागर केदार, गणेश चव्हाण, अविनाश गायकवाड, नागेश लोखंडे, जावेद सय्यद, सौरभ देशपांडे, सनी दिवटे, चिमण सोनवणे, सुरेश जगधने, सागर कोळी, गोविंद जगधने, आर्यन जावीर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!