धनगर गल्ली येथील महादेव मिसाळ यांचे निधन

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरातील धनगर गल्ली येथील महादेव शंकर मिसाळ यांचे शुक्रवार दि.9 जून रोजी रात्रीच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 62 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांचा तिसरा दिवस विधी आज रविवार दि.11 जून रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले.