शैक्षणिक

पायोनियर स्कूल मधील बिग बझार दिमाखात व उत्साहात संपन्न.

य.मंगेवाडी(वार्ताहर):- पायोनियर स्कूल मध्ये काल गुुरुवार दि.29 डिसेंबर  रोजी बिग बाझार, रांगोळी प्रदर्शन व कला प्रदर्शन भरवण्यात आले होते. या बिग बाजारसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने आणि भरघोस असा प्रतिसाद दिला. तसेच कला व रांगोळी प्रदर्शनातही विद्यार्थिनी अतिशय हिरहिरीने सहभाग नोंदविला.
बिग बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू, फळभाज्या, खाऊची दुकाने तसेच स्टेशनरी साहित्याचे दुकाने मोठ्या संख्येने मांडली होती. यलमार मंगेवाडी व परिसरातील सर्व नागरिकांनी या बाजारात वस्तू खरेदी करून अतिशय मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. शशिकांत येलपले व उपसरपंच अनिल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  विस्ताराधिकारी श्री सुयोग नवले व केंद्रप्रमुख श्री अमोगसिद्ध  कोळी  कमलापूर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणेश्री सुयोग नवले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून बिगबाजार चे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कला व रांगोळी प्रदर्शन यांची उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्याकडून रांगोळी व हस्तकला या दोन्हींचे क्रमांक निवडण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी केलेला उपक्रम अतिशय उल्लेखनीय असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!