रोटरी क्लब व इनरव्हील क्लबच्या देशभक्तीपर गीत समुह नृत्य स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद

सांगोला(प्रतिनिधी):-रोटरी क्लब सांगोला व इनरव्हील क्लब सांगोला यांनी देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन श्रीमती ताराबाई दोडकुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खास निमंत्रित म्हणून सांगोल्यातील माजी सैनिकांना निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन साळुंखे यांनी सांगोल्याची गौरवशाली कामगिरी सर्वांसमोर मांडली. त्यांच्या मनोगताने सर्व प्रेक्षक भारावून गेले व मुलांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवली गेली. स्पर्धेमध्ये 1 ली ते 4 थी गटात- 8 संघांनी, 5 वी ते 7 वी गटात- 7 संघांनी तर 8 वी ते 10 वी गटात 8 संघानी सहभाग नोंदविला होता.
पहिल्या गटात प्रथम क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापुर.( रोख 2500 रु.व ट्रॉफी सौजन्य- कविता कांबळे), व्दितीय क्रमांक फॅबटेक पब्लिक स्कूल, सांगोला. ( रोख 2000 रु. व ट्रॉफी सौजन्य वैशाली बेले ), तृतीय क्रमांक-उत्कर्ष प्राथमिक विद्यालय, सांगोला रोख 1500 रु.व ट्रॉफी सौजन्य सुनिता राऊत ) व उत्तेजनार्थ न्यू इंग्लिश स्कूल प्राथमिक विद्यालय, सांगोला (रोख 1000 रु. व ट्रॉफी सौजन्य गीता मोहिते ) यांनी पटकाविला.
दुसर्या गटात प्रथम क्रमांक सांगोला विद्यामंदिर , सांगोला. ( रोख 3500 व ट्रॉफी सौजन्य रो.डॉक्टर पिसे डायग्नोस्टिक सेंटर, सांगोला.), व्दितीय क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापुर.( रोख 3000 व ट्रॉफी सौजन्य रो. नितीन इंगोले. मेडशिंगी ) तर तृतीय क्रमांक उत्कर्ष माध्यमिक शाळा, सांगोला. ( रोख 2500 व ट्रॉफी सौजन्य रो नीलकंठ लिंगे सर )यांनी पटकाविला.
मोठ्या गटात प्रथम क्रमांक सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर. ( रोख 4000 व ट्रॉफी सौजन्य रो. नागेश तेली, सांगोला), व्दितीय क्रमांक विकास विद्यालय, अजनाळे. ( रोख 3500 व ट्रॉफी सौजन्य रो रमेशआण्णा देशपांडे, सांगोला.), तृतीय क्रमांक क्रांतिवीर वि दा सावरकर विद्यालय, चिनके.( रोख 3000 व ट्रॉफी सौजन्य रो धनाजी शिर्के.)यांनी पटकाविला.
यावर्षी अंकुश वाघमारे, सोलापूर व संध्या तेली , सांगोला यानां उत्कृष्ट कोरिओग्राफर म्हणून सन्मानित करण्यात आले. ट्रॉफीचे सौजन्य रो. अशोक नवले सर यांचेकडून करण्यात आले होते.या स्पर्धांसाठी सर्व रोटरी सदस्यांनी व इनरव्हील सदस्यसह आशपान शेख, बोत्रे, सूत्रसंचालक प्रशांत इंगोले पाटील मेडशिंगी फार मोलाचे सहकार्य केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी रो.दिपक चोथे, रो.इंजि.हमीद शेख, रो.इंजि.मधुकर कांबळे, रो.प्रवीण मोहिते, रो.डोंबे गुरुजी, रो.जगताप गुरुजी, रो.डॉ. प्रभाकर माळी, रो.इंजि.संतोष भोसले, रो.प्रतिमा माळी , रो.रत्नप्रभा माळी, रो.संतोष गुळमीरे, रो.महेश गवळी रो.इंजि.अशोक गोडसे, रो. शरणप्पा हळ्ळीसागर, रो.श्रीपती आदलिंगे, रो.अॅड.सचिन पाटकुलकर, रो.ज्ञानेश्वर कमले, रो.धनाजी शिर्के, रो.नागेश तेली, रो.बशीर भाई तांबोळी, रो.नीलकंठ लिंगे, रो.रमेशअण्णा देशपांडे, रो.अवधूत वाघमोडे व अध्यक्ष रो.साजिकराव पाटील, इनरव्हीलच्या अध्यक्षा सौ.सविता लाटणे, सौ.सुजाता पाटील, सौ.माधुरी गुळमिरे, सौ.संगीता चौगुले, सौ.गीता मोहिते, सौ कमले, सौ.रुक्मिणी आदलिंगे, सौ.सुनंदा माळी, सौ. सीमा गवळी, मीरा देशपांडे, सौ.मंगल ताई लाटणे इत्यादी सदस्य उपस्थित होते.