नाझरा विद्यामंदिर प्रशालेत गुणवंतांचा सत्कार व नवागतांचे स्वागत

नाझरा(वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाझरा विद्यामंदिर प्रशालेत आज मोठ्या उत्साहात शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला.यावेळी दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने पारितोषिक देऊन प्राचार्य अमोल गायकवाड,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन साक्षी भंडगे व पुनम वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नव्याने प्रवेश घेतलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
गुणवंतांच्या सत्कार नंतर बोलताना प्राचार्य अमोल गायकवाड म्हणाले की, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने मनःपूर्वक स्वागत,आपण ज्या विश्वासाने या शाळेत प्रवेश घेतला आहे तो विश्वास येथील प्रत्येक शिक्षक सार्थ करेल.आपणा सर्वांमध्ये प्रोत्साहन मिळून गुणवत्तेची वृद्धी व्हावी म्हणूनच यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा.यावेळी व्यासपीठावर पालक वसंत गोडसे,जीवन भंडगे, चंद्रकांत वाघमोडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.