सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये एसएससी परीक्षार्थींचे स्वागत;झूमॲप द्वारे पूर्णवेळ परीक्षार्थी ऑनलाईन निगराणीखाली

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत एसएससी परीक्षा-फेब्रुवारी 2025 शिस्तपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यभर जय्यत तयारी करण्यात आली असून सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या परीक्षा केंद्र क्रमांक 3161 मध्ये आज पहिल्याच दिवशी परीक्षार्थींचे स्वागत गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले साहेब, संस्थासचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, केंद्र संचालक प्राचार्य अमोल गायकवाड, उपकेंद्रसंचालक उपमुख्याध्यापिका सौ.शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद व प्रदीप धुकटे तसेच उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देत करण्यात आले व परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रारंभी विद्यादेवता माता सरस्वती आणि संस्थापक अध्यक्ष प्रातःस्मरणीय परमपूज्य कै.गुरुवर्य चं.वि. तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पण करत पूजन करण्यात आले.
एसएससी परीक्षा केंद्र क्रमांक 3161 सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोलामध्ये एसएससी-फेब्रुवारी 2025 या परीक्षेसाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला, ज्ञानदीप विद्यालय, सांगोला, उत्कर्ष विद्यालय, सांगोला, न्यू.इंग्लिश स्कूल, सांगोला, शिवणे माध्यमिक विद्यालय, शिवणे, ता.सांगोला आणि सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, सांगोला या शाळांमधील 650 विद्यार्थी परीक्षार्थी म्हणून प्रविष्ट असून या केंद्राच्या दक्षता समिती सदस्यपदी सुनील झपके, अमर गुळमिरे, अनुराधा खडतरे व विलास पाटील तर स्टेशनरी सुपरवायझरपदी नामदेव खंडागळे नियुक्त आहेत.
—————————————————
सांगोला विद्यामंदिर प्रशाला या परीक्षा केंद्राचा कडक व शिस्तीचे परीक्षा केंद्र असा तालुक्यात व जिल्ह्यात नावलौकिक असून ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या प्रेरणेतून व सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचा सर्व प्रशासकीय स्टाफ, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.