मुंबई रंगोत्सव सेलिब्रेशन, रंगभरण स्पर्धेमध्ये ,सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचे घवघवीत यश

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल हे नेहमीच विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत असते. दरवर्षीप्रमाणे विद्यालयामध्ये मुंबई रंगोत्सव सेलिब्रेशन रंगभरण स्पर्धा व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आला होत्या . विद्यालयातील 400 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये विद्यालयातील 127 विद्यार्थ्यांनी इंटरनॅशनल लेवल वर फर्स्ट रँक,थर्ड रँक,आर्ट मेरिट,गोल्ड मेडल ,सिल्वर मेडल व ब्रांझ मेडल तसेच विविध आकर्षक भेटवस्तू मिळवून परीक्षेमध्ये भव्य यश संपादन करून विद्यालयाचे नाव उंचावले आहे.
इयत्ता दुसरीचा विद्यार्थी कुमार आदिराज कोळसे-पाटील , इंटरनॅशनल लेवल मध्ये प्रथम क्रमांकाचे,कुमारी राजलक्ष्मी सुधीर खाडे तृतीय क्रमांक, वेदिका प्रदीप बनसोडे व दिव्या राजेश दुग्गेश्वर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे, ट्रॉफी, सरप्राईज गिफ्ट व प्रमाणपत्र असे बक्षीसाचे स्वरूप आहे.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुध्दचंद्र झपके सर यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये कु.पल्लवी थोरात यांना कलारत्न पुरस्कार,विद्यालयात बेस्ट स्कूल व मुख्याध्यापक यांना बेस्ट उपक्रमशील मुख्याध्यापक असे विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.कलाशिक्षिका कु.पल्लवी थोरात मॅडम यांचे विद्यार्थ्यांना नेहमी मोलाचे मार्गदर्शन मिळते. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कलाशिक्षिका यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो .
संस्थाध्यक्ष श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर, सचिव श्री. म. शं. घोंगडे सर,सहसचिव श्री. प्रशुध्दचंद्र झपके साहेब,खजिनदार,श्री. शं. बा. सावंत सर,कार्यकारिणी सदस्य श्री. विश्वेश झपके साहेब,यांच्यासह सर्व संस्था सदस्य,मुख्याध्यापिका कु.शिल्पा ढाळे , कु.सुकेशनी नागटिळक,पालकवर्ग व विद्यामंदिर परिवाराकडून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.