“मिसेस सांगोला- 2024″ही स्पर्धा उस्फूर्त प्रतिसादात अत्यंत उत्साहात संपन्न….

श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी महिला मंच आणि इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्यासाठी दि. 19/03/2024 रोजी दु. ठिक 12 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह(टाऊन हॉल),सांगोला येथे “मिसेस सांगोला- 2024” ही स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाली. या आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी सांगोला व परिसरातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला.या स्पर्धेत एकूण 25 स्पर्धक सहभागी झाल्याची माहिती सौ.लता कांबळे व सौ. सीमा गायकवाड यांनी दिली.
    स्पर्धेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व श्रीफळ वाढवून करण्यात आली. श्री.चौडेश्वरी देवांग कोष्टी महिला मंचच्या संचालक मंडळाने नृत्याविष्कारातून गणेशवंदना सादर केली. प्रांतीय वेशभूषेच्या प्रथम फेरीमधून स्पर्धेकांनी परिधान केलेल्या वेशभूषेविषयी रॅम्पवाॅक नंतर माहिती दिली. त्यातून उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार सौ. दिपाली कोळसे-पाटील यांना मिळाला. स्पर्धेची दुसरी फेरी स्पर्धकांच्या कलाविष्कार सादरीकरणाने सुरु झाली. उत्कृष्ट कलाविष्कार सादरीकरण पुरस्कार सौ. विनीता सुर्यवंशी यांनी पटकावला.
तिसरी फेरी वेस्टर्न रॅम्पवाॅक ची होती. वरील तिन्ही फेरीमधून उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून सौ. लक्ष्मी स्वामी या विजेत्या ठरल्या.
चौथ्या सेमीफायनल प्रश्नमंजुषा फेरीतील 10 स्पर्धकांमधून फायनल राऊंडसाठी 7 स्पर्धकांची निवड करण्यात आली. सर्व स्पर्धकांचे इतके उत्कृष्ट सादरीकरण होते की  प्रत्येक राऊंडमध्ये निवडीसाठी परीक्षकांचा कस लागत होता.
 स्पर्धेचे उत्तेजनार्थ पारितोषिक सन्मानचिन्ह व रोख  रु.1001 सौ. अर्चना कांबळे यांना, तृतीय पारितोषिक सन्मानचिन्ह व रोख रु. 2001 सौ. सानिका उंटवाले यांना, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सन्मानचिन्ह व रोख रु  3001सौ. मयुरी कांबळेयांंना तर मिसेस सांगोला- 2024 च्या विजेत्या सौ. शुभांगी पाटील ठरल्या. त्यांना क्राऊन, सन्मानचिन्ह व रोख रु 5001 देऊन सन्मानित करण्यात आले.
   मिसेस सांगोला- 2024 स्पर्धेतील विजेत्यांसाठी सचिन ज्वेलर्स, सांगोला यांचेकडून रु.5001, सौ. सुलोचना सपाटे रु. 3001, सौ. वैशाली केदार (हाॅटेल संगम) रु. 2001, सविता टकले रु. 1001,बेस्ट टायटल बक्षीसांसाठी सौ. अर्पणा शिंदे (संस्थापक मृदुला लॅबोरॅटरी अॅड रिसर्च सेंटर) रु. 2500, तर लकी ड्रॉ बक्षिसे रु. 3000 सौ. स्नेहल दौडे यांचेकडून देण्यात आली. सन्मानचिन्हे सौ. गीता दौडे तर क्राऊन सौ. तनू थोरात यांनी स्पॉन्सर केले.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. अपर्णा येडगे, सौ.तनू थोरात व मृणाल राऊत यांनी उत्कृष्टपणे काम पाहीले.विजेते स्पर्धकांचे बक्षीसवितरण वरील सर्व सन्माननीय बक्षीसदाते व परीक्षक  यांच्या हस्ते करण्यात आले.
     श्री चौंडेश्वरी देवांग कोष्टी महिला मंच आणि इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन ची माहिती अनुक्रमे सौ. आश्विनी दौडे  व डाॅ. सौ. सीमा गायकवाड यांनी दिली. मंचच्या अध्यक्ष सौ. लता कांबळे यांनी प्रास्ताविक करून स्पर्धेची माहिती सांगितली.इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन, कोल्हापूर विभाग यांच्यावतीने श्रीमती गीता गुळमिरे, न्यू.इं.स्कूल व ज्यु. काॅलेज सांगोला यांचा सायन्स टीचर म्हणून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
सौ. पल्लवी थोरात यांच्या बहारदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमाला रंगत आणली. वैष्णवी दौडे, रिया कुमठेकर व पूर्वा दौंडे यांच्या नृत्यगायनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कु. धनश्री रुपनर, कु. वैष्णवी पवार व कु. हातेकर यांनी  स्वागताची सुरेख रांगोळी रेखाटली होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी मंंचाच्या अध्यक्ष सौ.लता कांबळे,उपाध्यक्ष सौ. स्नेहा कुमठेकर, सचिव सौ. सीमा कांबळे, खजिनदार सौ. वैशाली लाटणे व संचालक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य व सौ.सीमा गायकवाड  यांनी परीश्रम घेतले.
    उत्कृष्ट साऊंड सिस्टीम श्री.तेजस बोत्रे, स्वरा फोटो स्टुडिओ, टाऊन हॉल कर्मचारी, सर्व स्टाॅलधारक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता मंचच्या संचालक सौ. वर्षा दौंडे यांनी आभार मानून केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button