स.शा.लिगाडे विद्यालयात जागतिक योग दिन साजरा

सरदार शामराव लिगाडे विद्यालय व भाई जगन्नाथराव लिगाडे जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स( कृषी) अकोला (वासुद)-विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये योग दिनाची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. यासाठी योग प्रशिक्षक श्री.गणेश कडव सर यांनी विविध योगासने व प्राणायाम बाबत उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना देऊन योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवीत विद्यार्थ्यांकडून ती करून घेतली यामध्ये सुरुवातीस विद्यार्थ्यांकडून पूरक हालचाली करून घेण्यात आल्या त्यानंतर खडे प्रकार ताडासन,वृक्षासन, त्रिकोणासन,सूर्यनमस्कार त्याचप्रमाणे बैठे प्रकार यात योगमुद्रा,बटरफ्लाय तसेच पोटावरील व पाठीवरील योगाचे प्रकार करून घेतले तसेच प्राणायाम मध्ये कपालभाती,अनुलोम-विलोम, ध्यान हे प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आले.