कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये उत्कर्ष विद्यालयाचे घवघवीत यश

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या 42 व्या स्मृती समारोह निमित्त तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये उत्कर्ष विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे
तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये कुमारी स्नेहल विलास जानकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तर जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये कु. ऋषी भारत पैलवान याने प्रथम क्रमांक प्राप्त करून विद्यालयाच्या यशाची कमान उंचावलेली आहे.
वरील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व चषक देऊन गौरवण्यात आले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्षा माननीय संजीवनी ताई केळकर, संस्थेचे पदाधिकारी, तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विश्रांती ताई मागाडे उप मुख्याध्यापिका स्वराली ताई कुलकर्णी पर्यवेक्षक भोसले सर मिसाळ सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वरील विद्यार्थ्यांना शुभांगी ताई कवठेकर यांनी मार्गदर्शन केले.