महाराष्ट्र
चोपडी येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर रमाकांत डोंगरे यांचे निधन

नाझरा (वार्ताहर):-सांगोला तालुक्यातील चोपडी येथील सेवानिवृत्त पोस्ट मास्तर व ह.भ. प. रमाकांत दत्तात्रय डोंगरे महाराज (वय ६५)यांचे गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
चोपडी पंचक्रोशीत आपल्या गोड गळ्याच्या माध्यमातून अनेकांना परिचित असणारे व्यक्तिमत्व होते.अभंगाच्या माध्यमातून देवावरची श्रद्धा व निष्ठा भक्तीभावाने ज्यांनी जपली. चोपडी व परिसरातील अनेक गावांमध्ये त्यांनी कीर्तनाची सेवा बजावली होती. परिसरातील अनेक ठिकाणी भजन,कीर्तन, प्रवचन असा कोणताही धार्मिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमात पेटीवरचा सूर आणि त्यांचा आवाज ऐकू आला नाही असं कधीच झाले नाही.चोपडी सांगोला,अकलूज, माळशिरस, नाझरे,कोळा अशा ठिकाणी 35 वर्ष पोस्टमास्तर म्हणून त्यांनी सेवा बजावली. कवी ज्ञानेश डोंगरे यांचे ते बंधू होते.गुरुवारी रात्री उशिरा चोपडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली,भाऊ, सूना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवारी सकाळी आठ वाजता चोपडी येथील स्मशानभूमी असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून समजते.



