आदर्श बालक मंदिर व प्राथमिक विद्यालयामध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सौ.शितल माळी मॅडम यांनी केले. याप्रसंगी कु. ज्योती कुदळे मॅडम यांनी शाहू महाराजांचा जीवनपट सांगून त्यांनी शैक्षणिक कार्याला महत्त्वपूर्ण स्थान दिले हे सांगितले. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थी चि. प्रतिक फुले व चि. रुद्र वाघमोडे यांनी मनोगते व्यक्त केली .
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री .दिपक वाघमोडे सर ,श्री. मयूर सुरवसे सर ,श्रीम. सुलेखा केदार मॅडम ,सौ. मयुरी राऊत मॅडम, सौ. जयश्री वाघमोडे मॅडम शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.