महाराष्ट्र
श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नाझरे येथे छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, नाझरे येथे सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री. दुर्योधन आलदर सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या प्राचार्या माननीय श्रीमती यास्मिन मुल्ला मॅडम होत्या. त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी श्री. नवनाथ बंडगर सर यांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांचे समाजसुधारणेतील कार्य, बहुजन समाजासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले योगदान विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री. दुर्योधन आलदर सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



