राष्ट्रवादीत मोठं काही तरी घडत असल्याची चर्चा; शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे प्रदेशाध्यक्षपदासाठी अडून बसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार नाराज असल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार पोहोचलेले आहेत. सकाळपासूनच ही बैठक सुरू असून त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले आजचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याने राष्ट्रवादीत मोठं काही तरी घडत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षातील नाराजीनाट्यावर भाष्य केलं.

 

अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक कशासाठी घेतली हे मला नक्की माहीत नाही. पण विरोधी पक्षनेता म्हणून सदस्यांची बैठक बोलावण्याचा त्यांना अधिकार आहे. ते अशा बैठका बोलवत असतात. विषय काय आहे माहीत नाही. पण संध्याकाळपर्यंत मला त्याची माहिती मिळेल. या पेक्षा अधिक माहिती मला नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या बैठका होतच असतात. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. पण 6 तारखेला महत्त्वाची बैठक होणार आहे. ती नेत्यांची बैठक आहे. मी नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button