सांगोला तालुका

चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने देशाची मान जगभरात उंचावली- ना.रामदास आठवले; चिकमहूद येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने देशाची मान जगभरात उंचावली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली देशाची दमदार प्रगती सुरू आहे.त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीची आम्हाला अजिबात चिंता नाही.”जर तुम्हाला फुलवायचे असेल शिवरायांच्या विचाराचा पिक” तर हातात घ्यावे लागेल माझ्या भिमरायाचे बुक”समाजामध्ये परिवर्तन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत मोलाचे योगदान आहे.असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांनी चिकमहूद (ता.सांगोला) येथे बोलताना सांगितले.
चिकमहूद ग्रामस्थांच्या वतीने, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या संकल्पनेतून  चिकमहूद येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री श्री.आठवले यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास आमदार ॲड्.शहाजी पाटील, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे,विधान परिषदेचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, एनडीएमजे संघटनेचे सचिव वैभव गीते, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार,भाऊसाहेब रुपनर,
सुनील सर्वगोड,सोमनाथ भोसले,आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू सातपुते आदी उपस्थित होते.
श्री.आठवले पुढे बोलताना म्हणाले की, देशातील सर्व समाजांना एकत्रित करण्याचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.त्याच विचारावर चालणारे येथील आमदार शहाजी पाटील यांनी सर्व समाजांना एकत्र केले आहे.महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत आमदार शहाजी पाटील आणि इतरांनी घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे.गावाची प्रगती झाली की,देशाची प्रगती होते.यानुसार आमदार शहाजी पाटील तालुक्यातील प्रत्येक गावाच्या प्रगतीसाठी झटत आहेत. शहाजीबापूनी तालुक्याचे सौंदर्य बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे.असेही श्री.आठवले म्हणाले.
आमदार शहाजी पाटील म्हणाले की,आपण सर्वप्रथम आपल्या गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना करून राजकारणामध्ये प्रवेश केला आहे.भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या प्रत्येक शब्दाने वंचिताच्या जीवनातील अंधार दूर केला आहे.डॉ.आंबेडकर हे जगभरातील वंचितांचा आधार आहेत.आपल्या पुर्वजांनी १९३७ मध्ये चिकमहूद या गावात “एक गाव एक पाणवठा” ही योजना राबवून त्यावेळेस जातीभेद संपला होता.सामाजिक न्यायाच्या चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक तरुण कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचावीत.त्यामुळे ही चळवळ अधिक गतिमान होईल,असेही आमदार शहाजी पाटील म्हणाले.
यावेळी सागरदादा पाटील,दिग्विजय पाटील, , दादासाहेब लवटे,भाऊसाहेब रुपनर,नवनाथ मगर,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,सुरेश कदम, प्रमोद हूबाले, सतीश काटे, राहुलकुमार काटे,दादासाहेब क्षीरसागर,स्वप्निल सावंत,पंकज काटे,वैभव काटे,सौदागर सावंत,गौतम चंदनशिवे आदी मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!