सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी
सांगोला:- सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात लोकमान्य टिळकांची जयंती साजरी करण्यात आली.
 दि.23 जुलै 2024 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त्त त्यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक उदय बोत्रे  यांनी पुष्‍पहार अर्पण करून प्रतिमेचे पुजन  करण्यात आले.
 यावेळी विद्यालयातील सह शिक्षक जगन्नाथ साठे यांनी  यांनी लोकमान्य टिळक यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाचे योगदान होते. त्यांच्या कार्याबदद्ल लोकांना आदर होता असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील काही प्रसंग सांगितले.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चेतन कोवाळे यांनी केले तर आभार वैशाली पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button