उत्कर्ष विद्यालयात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न!!!

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालय सांगोला येथे इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कर्ष विद्यालयाने उज्वल यश प्राप्त केले. इयत्ता पाचवी मधील समर्थ संजय शिंदे व श्रेयस शिवाजी बाबर यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले तसेच इयत्ता आठवी मधील वैष्णवी विजय राऊत, आर्या राजकुमार गावडे, वेदिका भास्कर कुंभार, रेणुका सोमनाथ दिवटे, सिद्धी शिवदास दिवटे, प्रांजली पांडुरंग पवार या विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावत विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम राखली. त्याचबरोबर शिवतेज संताजी शिंदे, शर्वरी रामदास जाधव, अक्षरा रमेश जाधव, आदित्य दत्तात्रय खटकाळे, संतोष गायकवाड यांनीही विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली.
  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा तसेच पालकांचा सत्कार सोहळा सांगोला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मा.श्री गायकवाड साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनील कुलकर्णी सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सांगितली तसेच विद्यालयाच्या यशाचा आलेख सर्वांसमोर मांडला.
या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी बोलताना श्री गायकवाड साहेब यांनी विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले तसेच सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना शाबासकी दिली.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील कुलकर्णी सर तसेच उत्कर्ष विद्यालयात घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची व माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी आलेली अमेरिकन पाहुणी मैथिली पै आणि माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक मिसाळ सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक श्री. प्रशांत भोसले सर यांनी केले तर सौ निशा बनसोडे मॅडम यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button