वाडेगांव येथे अधिक मासानिमित्त वृक्षारोपण व माणदेशी कवी संम्मेलन

वाडेगांव दि. २४ – वाडेगांव ता. सांगोला येथील त्रिवेणी संगमावर अधिक श्रावण मासानिमित्त मान्यवरांच्या हस्ते पुर्वी लावलेल्या वृक्षांचे वाढदिवस करणे, वृक्षारोपण करणे व त्यानंतर कवी संम्मेलन आयोजित करण्यात आले आहे.
पुणे येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी व रोटरी क्लब ऑफ सांगोला ३१३२ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच निमंत्रक माणगंगा भ्रमणसेवा बहुउद्देशीय संस्था ता. सांगोला यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वा. तहसिलदार मा. संजयजी खडतरे, गट विकास अधिकारी आनंद लोकरे, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे , साहित्य कला अकादमी पुणे अध्यक्ष सुदाम भोरे, रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष डॉ.ला.साजिकराव पाटील, डॉ.मच्छींद्र सोनलकर, डॉ. कृष्णा इंगोले, सां.ता.उ.शि.मंडळ सचिव म.सि.झिरपे सर, सरपंच नंदकुमार दिघे, माणगंगा सेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे इ.मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पुर्वी लावलेल्या वृक्षांचे वाढदिवस करणे व माणदेशी कवी संम्मेलन सादर होणार आहे.
या कवि संम्मेलनात माणदेश आधारित नद्या, निसर्ग, पर्यावरण यासंबंधीत कविता सादर करणेविषयी परीसरातील कवीना आवाहन करण्यात येत आहे. तरी माणदेश परीसरातील कवीनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. दुपारी भोजनाची सोय करण्यात आली आहे.