आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी जन्मलेल्या मुलींच्या नांवे प्रत्येकी १५ हजार रूपयांची ठेव ठेवण्याचा संकल्प कायम

सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते तसेच राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी सांगोला तालुक्यात जन्मलेल्या मुलींच्या नांवे प्रत्येकी १५ हजार रूपयांची राजमाता महिला पतसंस्थेमध्ये मुदतठेव ठेवण्याचा संकल्प कायम ठेवला आहे. समाजामध्ये मुलींचे प्रमाण वाढावे, मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव होऊ नये, मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे या उदात्त हेतूने २०१५ सालापासून हा सामाजिक संकल्प सुरू करून आनंदा माने यांनी तालुक्यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.

यावर्षी दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी तालुक्यामध्ये जन्माला येणार्‍या मुलींच्या नांवे प्रत्येकी १५ हजार रूपयांची ठेव ठेवली जाणार असून ती प्रत्येक ७ वर्षांनी दामदुप्पट करून मुलीच्या २१ व्या वर्षी ही रक्कम जवळपास १ लाख २० हजार रू. इतकी होणार आहे. ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी तसेच तिच्या लग्नकार्यासाठी वापरण्यात यावी, मुलीच्या आई-वडीलांवर आर्थिक ताण पडू नये, या सामाजिक हेतूने आनंदा (भाऊ) माने यांनी हा संकल्प सुरू केला आहे.

आनंदा माने यांच्या वाढदिवसादिवशी दि. ०३ ऑगस्ट २०१५ साली तालुक्यातून जन्माला आलेल्या ५ मुलींच्या नांवे प्रत्येकी ५,००० रूपयांची, २०१६ साली ७ मुलींच्या नावे प्रत्येकी ७,००० रू, २०१७ साली ४ मुलींच्या नांवे प्रत्येकी १०,००० रू, २०१८ साली ६ मुलींच्या नांवे प्रत्येकी १०,००० रू, २०१९ साली ३ मुलींच्या नांवे प्रत्येकी १०,००० रू, २०२० साली ५ मुलींच्या नांवे प्रत्येकी १०,००० रू, २०२१ साली ६ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५,००० रू, २०२२ साली ७ मुलींच्या नांवे प्रत्येकी १५,००० रू. अशी मुदत ठेव ठेवण्यात आली आहे.

आनंदा माने यांनी या आगळ्या वेगळ्या संकल्पातून एक सामाजिक कार्य तर केले आहेच, त्याचबरोबर समाजासमोर एक आदर्श सुध्दा घडविला आहे. या संकल्पाबद्दल जनमाणसांतून आनंदा (भाऊ) माने यांचे कौतुक व आभार व्यक्त होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button