सांगोला तालुक्यात चारा छावण्या सुरु करा; सांगोला युवा सेनेची मागणी

सांगोला तालुका दुष्काळी म्हणुन जाहीर करून जनावरांच्या छावण्या व लोकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरीत चालू करावेत अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी युवा सेना सांगोला च्या वतीने तहसीलदार सांगोला यांच्याकडे करण्यात आले असल्याची माहिती युवासेना तालुका युवाधिकारी सुभाष भोसले यांनी दिली.
सांगोला तालुका व परिसरात पावसाळा चालू झालेपासून अद्यापही पाऊस झालेला नाही. हवामान अंदाजानुसार आतापर्यंत झालेल्या पावसाची नोंद सरासरीच्या फक्त 3 % पावसाची नोंद झालेली आहे. सध्या पाऊस झाला नसलेने तालुक्यातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा विषय गंभीर झालेला आहे. त्यामुळे तालुक्यातील गावा-गावातील सव्हे करुन त्वरीत पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू करावेत. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. लोकांच्या शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मोठया प्रमाणावर चालू आहे. परंतु पाऊस न झालेने दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवली आहे. सध्या चारा उपलब्ध नाही त्यामुळे पशुधन वाचविण्यासाठी जपण्यासाठी चारा छावण्या चालू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन देते प्रसंगी जेष्ठ शिवसैनिक हरीभाऊ पाटील, युवासेना समन्वयक शंकर मेटकरी, युवासेना उपजिल्हाप्रमुख रघुनाथ गायकवाड, युवासेना तालुका प्रमुख सुभाष भोसले, शहर प्रमुख सौरभ चव्हाण, नवल गाडे, समाधान चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख अजय चव्हाण, अनिल बेहरे, बाबासाब खांडेकर, सचिन शिंदे, बाबासाहेब ऐवळे, सचिन सुरवसे, उमेश जावीर, सुमित चांदणे, अक्षय रुपनर, रघुनाथ ऐवळे व शिवसैनिक उपस्थित होते.