आनंदा माने यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराजांच्या किर्तनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा गटनेते तसेच राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदा (भाऊ) माने यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ३ ऑगस्ट २०२३ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये गुरूवारी दि. ०३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच सायं. ठिक ४ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेज सांगोला येथे हभप निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या किर्तनाचे नियोजन करण्यात आले आहे.
त्याचबरोबर रविवार दि. ३० जुलै २०२३ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे सकाळी ९ ते ११ यावेळेमध्ये सांगोला तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामध्ये तीन वयोगटामध्ये क्रमांक काढले जाणार असून प्रत्येक गटातील पहिले बक्षीस सायकल, द्वितीय बक्षीस स्मार्टवॉच, तृतीय बक्षीस स्कूलबॅग व उत्तेजनार्थ बक्षीस जेवणाचा डबा व रंगपेटी असणार आहे. तसेच यामध्ये पहिली ते तिसरीच्या वयोगटासाठी प्रत्येकी सहभागी विद्यार्थ्यास आकर्षक भेट वस्तू दिली जाणार आहे.
या रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वाटप हे गुरूवार दि. ३ ऑगस्ट रोजी सायं. ४ वाजता सांगोला विद्यामंदिर प्रशाला याठिकाणी हभप निवृत्ती महाराज इंदूरीकर यांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाअगोदर करण्यात येणार आहे, असल्याची माहिती आनंदा माने अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली.



