नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास केला – चेतनसिंह केदार-सावंत; जुनोनी येथे टिफीन बैठक विथ मन की बात कार्यक्रम संपन्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने केवळ नऊ वर्षांत देशाचा संपूर्ण कायापालट केला आहे. भाजपाच्या काळात सुरू झालेले बहुतांश प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण झाले. अनेक प्रकल्प आणि विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. देशांतर्गत रस्ते, पूल यांचे जाळे निर्माण झाले आहे. दळणवळण गतिमान झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपली संपूर्ण हयात लोकांच्या सेवेत वाहिली असून गेली नऊ वर्षे त्यांनी देशासाठी समर्पित केली आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार देशात समता निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास केला असून देश प्रगतिपथावर घोडदौड करत असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत जुनोनी ता.सांगोला येथे मीटिंग विथ टिफीन बैठक आणि मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत बोलत होते. यावेळी माजी सभापती संभाजी आलदर, शिवाजीराव गायकवाड, दुर्योधन हिप्परकर, शिवाजी घेरडे, भाऊसो पाटील, राहुल हिप्परकर, नारायण बजबळे, विलास व्हनमाने, मोहन बजबळे, सोमा कर्चे, विशाल गाडे, भगवान हिप्परकर, रवी खंडागळे, विजय खटके, गंगाराम वाघे, महेश व्हनमाने, सतीश गुरव, भिमराव खरात, समाधान कांबळे, महेश गुरव, विनोद उबाळे, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी हे भाजपाच्या समाजकारण आणि राजकारणाचे प्रमुख सूत्र आहे. देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदी यांच्या प्रत्येक धोरण आणि कृतीत भारत प्रथम ठेवला आहे. आर्थिक व्यवस्थापन, उपेक्षित समाजाचे सक्षमीकरण, संस्कृतीचे संवर्धन, आव्हानात्मक उद्दिष्टे आणि निर्धारित मुदतीपूर्वी ते साध्य करणे हेच पंतप्रधान मोदी यांची मोठी उपलब्धी आहे. देशात डिजिटल क्रांती होत असून देशात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. ग्रामीण भागात विद्युतीकरण आणि प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. सरकारी योजना थेट लोकांपर्यंत पोहोचत आहेत. मोदी सरकारने सर्वांगीण विकासाची संस्कृती आणली. विकास आणि कल्याणकारी योजनांनी विविध उपेक्षित गटांचे अपरिवर्तनीय सशक्तीकरण केले आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व अबाधित राखून होणाऱ्या विकासावर पंतप्रधान मोदी यांचा प्रचंड विश्वास आहे. भारताने पर्यावरण रक्षणासाठी जागतिक स्तरावर नेतृत्व केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करत आहोत. या अमृत पर्वात देशाचा आणि पर्यायाने सर्वसामान्य लोकांचा विकास हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.