भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघातील दलित वस्त्यांच्या विकास करणेसाठी ५कोटीचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील.

ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करण्यासाठी या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील ४३ कामांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली
या निधीमधून विविध गावातील दलित वस्ती अंतर्गत रस्ते करणे, सामाजिक सभागृह बांधणे, विविध ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवणे, सभा मंडप बांधणे आंबेडकर भवन बांधणे, बैठक व्यवस्था तयार करणे, सुशोभीकरण करणे, पत्रा शेड मारणे, बहुउद्देशीय सभागृह बांधकाम करणे, स्मशानभूमी सुधारणा करणे, दलित वस्ती मध्ये गटारी तयार करणे, अशी कामे केली जाणार असल्याने वंचित असणाऱ्या दलित वस्त्यांचा सर्वांगीण मूलभूत विकास होणार असल्याने दलित बांधवांच्या मध्ये समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
सदरील कामांचे तात्काळ अंदाजपत्रके तयार करून, निविदा प्रक्रिया करून कामे वेळेत व दर्जेदार करण्याच्या सूचना यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.