सांगोला तालुका

कै. सौ.अपर्णा अरुण वाघमोडे यांच्या स्मरणार्थ विद्यार्थिनीला सायकल भेट तसेच महापारायण अन्नदानासाठी १० हजार रुपयांची देणगी 

सांगोला ( प्रतिनिधी )- विविध सामाजिक उपक्रम राबवत कै. सौ.अपर्णा अरुण वाघमोडे यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मरणार्थ आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने एका विद्यार्थिनीला सायकल भेट देण्यात आली.
            कै. सौ.अपर्णा अरुण वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त कडलास येथील दत्त मंदिरात शनिवारी रात्री भजन संध्या आयोजित करण्यात आली होती. यात कवठे महांकाळ येथील बाळासाहेब कुंभार, हार्मोनियम वादक दयानंद बनकर, बाळुकाका कुंभार यांनी सहभाग घेतला त्याना तबल्याची साथ सुभाष सदामते, रणजित सुतार यांनी केली. माऊली संगीत भजनी मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ यांनीही यावेळी सहभाग नोंदवला. रविवारी सकाळी ह.भ.प. श्री मच्छिंद्र सरगर महाराज यांची गीत रामायण कथा झाली. त्यांना गायनाची साथ मच्छिंद्र कोळेकर, पोपट बंडगर, सिद्धेश्वर कुंभार यांनी केली तर तबल्याची साथ सुधाकरपंत कुंभार यांनी केली. त्यानंतर भावपूर्ण वातावरणात कै. सौ. अपर्णा वाघमोडे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
         यावेळी संत गजानन भक्त परिवार, महापारायण समिती, पंढरपूर यांच्या २८ जानेवारी २०२४ रोजी आयोजित महापारायण सोहळ्यातील अन्नदानसाठी कै. अर्पणा अरुण वाघमोडे यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त १०,८७० /- रू देणगी देण्यात आली. तसेच माझ्या परिघात सेवा समूह प्रेरित मातोश्री अपर्णाताई वाघमोडे मुक्त वाचनालय सांगोला मार्फत ४०० हरिपाठ वाटप करण्यात आले.
          या कार्यक्रमाला प्रांताधिकारी समाधान घुटुकडे, उद्योगपती भाऊसाहेब रुपनर, एलआयसी पंढरपूरचे रणजीत जगताप, कडलासचे सरपंच, विविध सोसायटीचे चेअरमन, डॉ. परेश खंडागळे, महावीर आलदर, डॉ. गणेश गुरव, ऍड. गजानन भाकरे, आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव, अरुण जगताप गुरुजी, अण्णासाहेब मदने गुरुजी, कडलास हायस्कूलचे प्राचार्य, कडलास गावचे प्रतिष्ठित नागरिक व महिला, नातेवाईक, बिरा महाराज बंडगर. विठ्ठल मल्टीस्टेटचे दीपक बेंद्रे आदिसह कडलासचे ग्रामस्थ वाघमोडे कुटुंबीय व  उपस्थित होते. आभार अतुल वाघमोडे यांनी मानले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!