सांगोला विद्यामंदिरमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न

सांगोला (प्रतिनिधी ):- सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज,सांगोला येथे इयत्ता अकरावी व बारावी गटासाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं.घोंगडे,प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद, वाड्.मय प्रमुख प्रा.शिवशंकर तटाळे, लायन्स झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण, लायन्स क्लब ऑफ सांगोला अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन दिलेल्या विषयावर आपले विचार व्यक्त करत वक्तृत्व सादर केले. या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य शाहिदा सय्यद यांनी केले सूत्रसंचालन प्रा.सुऱ्याबा आलदर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.कु.अर्चना कटरे यांनी केले
सदर स्पर्धेचे परीक्षण प्रा. चिंतामणी देशपांडे ,प्रा.सौ.अश्विनी जालगिरे, प्रा.सौ माधुरी पैलवान यांनी केले.या स्पर्धेमध्ये कुमारी लिगाडे सृष्टी सुनिल ११ वी संयुक्त प्रथम क्रमांक, कुमारी काशीद मोनीका विठ्ठल १२ वी शास्त्र द्वितीय क्रमांक, कुमार मासाळ सुरज विलास ११ वी शास्त्र तृतीय क्रमांक,कुमारी इंगोले प्रणोती शिवाजी १२ शास्त्र उत्तेजनार्थ,कुमारी मुलाणी शाहिन जावीद१२ शास्त्र उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव म.शं.घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था खजिनदार शंकरराव सावंत , संस्था कार्यकारणी विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शाहिदा सय्यद ,पर्यवेक्षक अजय बारबोले , पोपट केदार बिभिषण माने शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.