महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिर येथे इ.१२वी पालक-शिक्षक सभा संपन्न
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित, सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे दुसरे सत्र इ.१२वी कला, वाणिज्य, शास्त्र शाखा विद्यार्थ्यांची पालक- शिक्षक सभा उत्साहात पार पडली.
यावळी व्यासपीठावर सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रा.धनाजी चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्व उपस्थितांचे स्वागत करून शिक्षक-पालक सभेचे महत्त्व सांगत सभेचा हेतू स्पष्ट केला.
यानंतर शिक्षक मनोगतातून प्रा. विजयकुमार सासणे, प्रा.राजेंद्र कुंभार,प्रा.गणेश घेरडीकर,प्रा. नवनाथ बंडगर यांनी ‘बारावी बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना’ विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबतचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यामध्ये बोर्डाची परीक्षा सुरू होईपर्यंतच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व विषयांच्या अभ्यासाचे नियोजन, अभ्यासामधील,सातत्य, वाचन- लेखन सराव,मोबाईल आणि टीव्ही पाहणे टाळण यासह विद्यार्थ्यांच्या आहार व आरोग्य यासंदर्भातील लक्ष याविषयी मार्गदर्शन केले.
पालकांच्या मनोगतातून रुकसाना शेख यांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत संस्थेचे,शाळेचे व शिक्षकांचे आभार मानले तर शिवाजी चौगुले यांनी स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतातून उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद यांनी ‘बोर्ड परीक्षेला सामोरे जाताना’ विद्यार्थी आणि पालक यांना संबोधित करताना घरामध्ये तणावमुक्त वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास प्रवृत्त करावे व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवावा. अभ्यासाचे अचूक नियोजन करून परीक्षेस सामोरे जावे. तसेच बोर्डाच्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा देऊन अधिकाधिक गुण प्राप्त करावेत असे सांगत सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या सभेचे सूत्रसंचालन प्रा.आरती वेदपाठक यांनी केले आणि आभार प्रा.निलेश नागणे यांनी मानले.