सांगोला विद्यामंदिरमध्ये माजी विद्यार्थी नूतन पोलीस उपनिरीक्षक अजित कोळेकर यांचा सत्कार

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी अजित कोळेकर यांची नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड,
उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद,उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक मच्छिंद्र इंगोले, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या यशाबद्दल खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. एन.डी.बंडगर यांनी केले.



