*म.सा.प शाखा पंढरपूरकडून प्रा.धनाजी चव्हाण यांचा सत्कार*

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ,सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे अध्यापक व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सांगोला प्रमुख कार्यवाह प्रा.धनाजी चव्हाण यांना संस्थापक सुरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन दशकाहून अधिक काळ सामाजिक,शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात अमोघ कार्य करणाऱ्या छत्रपती परिवाराकडून प्रतिष्ठेचा जिल्हास्तरीय कृतिनिष्ठ पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूरकडून शाखेचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे विभागीय कार्यवाह कल्याणराव शिंदे, पंढरपूर शाखेचे कार्याध्यक्ष अशोक माळी,उपाध्यक्ष भास्कर बंगाळे,संजय रत्नपारखी,सहकार्यवाह दत्तात्रय तरळगट्टी, राजेश पवार,कोषाध्यक्ष मंदार केसकर,सदस्य गणेश गायकवाड,जैनुद्दीन मुलाणी, विणा व्होरा,प्रा.रामलिंग हागवणे,प्रियांका कौलवार,घन:श्याम शिंदे,
आशा पाटील, निमंत्रित सदस्य दिलीप कोरके, साप्ताहिक राष्ट्रसंतचे राधेश बादले- पाटील, शहाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते .