विज्ञान महाविद्यालय, सांगोलाचे नामांतर; विज्ञान महाविद्यालय आता डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय म्हणून ओळखले जाणार

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला, जि. सोलापूर या संस्थेच्या विज्ञान महाविद्यालय, सांगोला, जि. सोलापूर या महाविद्यालयाचे नाव आता बदलणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने नामांतराचा ठराव मंजूर केला असून आता विज्ञान महाविद्यालय हे आता नवीन शैक्षणिक वर्षापासून डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला जि.सोलापूर म्हणून ओळखले जाणार आहे.
सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला, जि. सोलापूर या संस्थेच्या विज्ञान महाविद्यालय, सांगोला, जि. सोलापूर या महाविद्यालयाच्या नावात डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय. सांगोला, जि. सोलापूर असा बदल करण्यास करण्यात आला आहे. संस्थेमार्फत संस्थेचे संचलित विज्ञान महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयाच्या नावात शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून बदल करण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाला होता. सदरील प्रस्तावावर विहित कार्यवाही करून शासनास सादर करण्यात आला होता. त्यास शासनाने महाविद्यालयाच्या नावात शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून बदल करण्यास मान्यता दिलेली आहे.
महाविद्यालयाच्या नावातील बदल हा फक्त त्या बाबी पुरताच मर्यादीत असून अशा बदलामुळे त्या महाविद्यालयास यापूर्वी प्राप्त मूळ शासनमान्यतेत बदल होणार नाही. अशा नाव बदलामुळे शासनावर कोणतेही अतिरिक्त दायित्व निर्माण होणार नसल्याचे महाविद्यालयाच्या नावातील बदल मान्यता पत्रात नमूद करण्यात आले आहे.