देवदर्शन आटपून घराकडे परतताना  रिक्षा पलटी; ७५ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार

सांगोला – देवदर्शन आटपून घराकडे परतताना  रिक्षा चालकाचा ताबा सुटल्याने धोकादायक वळणावर भाविकांची भरधाव रिक्षा पलटी झाल्याने अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली तर चार भाविक गंभीर जखमी झाले.हा अपघात मंगळवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास लोटेवाडी – महूद रोडवरील अचकदाणी ता सांगोला येथील गावाजवळ घडला.चांगुणा अर्जुन मोहिते -७५ रा. करकंब ता. पंढरपूर असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. मीना रामदास माने-४८ , सिध्दू अर्जुन मोहिते-४०  करकंब ता पंढरपूर, नंदा सुभाष पवार-५४ रा. मंगळवेढा, लक्ष्मी गणेश चौगुले -३५ रा.दौंड जि.पुणे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
फिर्यादी, अनिल माने रा. करकंब ता पंढरपूर यांची आजी चांगुना मोहिते, आई मीना मोहीते , मामा सिद्धू मोहिते , मावशी नंदा पवार व मावस बहीण लक्ष्मी चौगुले असे पाच जण नातेवाईक मिळून काल मंगळवारी सकाळी पंढरपूर येथून रिक्षा चालक राहुल हनुमंत पवार( रा. जुना कराड नाका पंढरपूर ) यांच्या एम एच १३- सीटी- ४२०४ या रिक्षातून लोटेवाडी ता. सांगोला येथील म्हसोबाच्या देवदर्शनासाठी गेले होते तेथून देवदर्शन आटपून दुपारी ४:३०च्या सुमारास परत लोटेवाडी- महूद रोडने पंढरपूरकडे येत असताना वाटेत  रिक्षा चालक राहुल पवार याचा आचकदाणी गावाजवळ धोकादायक वळणावर ताबा सुटल्याने भरधाव रिक्षा रोडच्या खाली पलटी झाल्याने हा अपघात झाला. अपघातात चांगुना मोहिते यांच्या डोकीस गंभीर मार लागून हात फ्रॅक्चर झाल्याने जागीच ठार झाल्या.मीना माने,नंदा पवार, सिद्धू मोहिते व लक्ष्मी चौगुले यांच्या डोकीस, तोंडाला, पायाला , मांडीला गंभीर मार लागून गंभीर जखमी झाले. याबाबत अनिल रामदास माने यांनी फिर्याद दिली असून , पोलिसांनी रिक्षा चालक राहुल हनुमंत पवार रा.जुना कराडनाका , पंढरपूर यांचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button