सेंद्रिय शेती शेतकऱ्यांची खा. शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत संवाद बैठक – कृषिभूषण अंकुश पडवळे

सांगोला – सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबरोबर माझी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार रविवारी सांगोला येथे संवाद साधणार आहेत असे मोर्फाचे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी सांगितले

सांगोला येथील हर्षदा लॉन्स येथे रविवार दि. १३ ऑगस्ट रोजी सायं ४.३० वा. महाऑरगॅनिक अँड रेसिड्यूफ्री फार्मर्स असोसिएशन अर्थात मोर्फा च्या वतीने सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीत खा.पवार शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.मोर्फा ही संस्था राज्यामध्ये सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे संघटन असून राज्य सरकार व केंद्र सरकारच्या पातळीवर सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्याचा पाठपुरावा शासन पातळीवर मोर्फा करीत असतो.
महाराष्ट्रात हजारो शेतकरी सेंद्रिय व विषमुक्त शेती करतात परंतु योग्य व किफायतशीर मार्केट मिळत नसल्यामुळे सदर सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना परवडत नाही. मानवी आहारात सेंद्रिय उत्पादनाचे अनन्य साधारण महत्व आहे. पण सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही योग्य बाजारभाव मिळने गरजेचे आहे. भाव मिळत नसल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे पाठ फिरवत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी शासनपातळीवर मोठया प्रमाणावर प्रयत्न होणे अंत्यन्त गरजेचे आहे. सेंद्रिय व विषमुक्त शेती तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण करणे, असा माल निर्यात करण्यासाठी निर्यातीमध्ये सवलती देणे, निर्यातीच्या वाहतुकीमध्ये अनुदान देणे गरजेचे आहे. . तसेच सेंद्रिय व विषमुक्त मालाचे तपासणी करण्यासाठीच्या लॅब मोठ्या प्रमाणावर उभा करून त्याचा लाभ ग्राहकांना व शेतकऱ्यांना करून देणे ही गरजेचे आहे कारण विषमुक्त मालाची विश्वासार्हता व ट्रेसबिलिटी ही त्या त्याच्या विक्रीशी संबंधित असल्याने त्याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहून आपला शेतीमाल उत्पादन केला पाहिजे. सदर सेंद्रिय व विषमुक्त शेतकऱ्यांच्या चर्चा संवादातून वरील विषयाला वाचा फोडण्यासाठी या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचेही कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी सांगितले. यावेळी मोर्फा चे संचालक अमरजीत जगताप हरिभाऊ यादव जिल्हाध्यक्ष संजय दिघे उपस्थित होते.

“सेंद्रिय शेती बरोबर शेतीतील शेतीपूरक उद्योगातून विषमुक्त शेती उत्पादने निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे त्या दृष्टीने विषमुक्त दूध उत्पादन करून ते स्थानिक मार्केटमध्ये विक्री करण्यासाठी ची यंत्रणा शासनाच्या मदतीने उभा करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबत ही आमचा शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. “

– कृषिभूषण अंकुश पडवळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button