सांगोला विद्यामंदिर मध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन उत्साहात*
*डोरेमोन व जोकरच्या गमती-जमतीने आनंदले विद्यार्थी*

सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये इयत्ता पाचवी मधील नवागत विद्यार्थ्यांसाठी वासंतिक वर्ग सुरू करण्यात आले असून कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन व संस्थापक अध्यक्ष, गुरुवर्य कै चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं.घोंगडे सर, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपप्राचार्या शाहिदा सय्यद, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, पर्यवेक्षक अजय बारबोले व पोपट केदार उपस्थित होते.
प्राचार्य गंगाधर घोंगडे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांचे स्वागत करत पहिल्याच दिवशी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद व्यक्त करत प्रास्तविक केले. अनिल खिलारे सर यांनी पालक मनोगतातून सांगोला विद्यामंदिर ही महाराष्ट्रातील नावाजलेली शाळा असून आमचे पाल्य या शाळेत शिक्षण घेणार आहेत हे त्यांचे भाग्यच असल्याची भावना पालक मनोगततून व्यक्त केली.
*विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते पुष्प व चॉकलेट्स वाटून करण्यात आले. डोरेमोन व जोकर या कार्टून व्यक्ति रेखांनी केलेल्या गमती-जमतीमुळे विद्यार्थी आनंदित झाले. बलून्स डेकोरेशन व सेल्फी पॉइंटवर विद्यार्थ्यांनी मनमुराद फोटोग्राफी केली. याप्रसंगी पालकांनाही सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.*
सकाळी 08.00 ते 10.20 या वेळेत हे वासंतिक वर्ग सुरू राहणार असून उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना आनंद देण्यासाठी व त्यांच्या विविध कलागुणांचा विकास साधण्यासाठी या पुढील वेळेत नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव कोठावळे व आभार पर्यवेक्षक पोपट केदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख नरेंद्र होनराव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



