सांगोला रोटरी क्लब तर्फे कारगील विजय दिनानिमित्त सेवानिवृत्त जवानांचा सन्मान

सांगोला- सांगोला रोटरी क्लब नवनवीन सामाजिक उपक्रम हाती घेत असुन विधायक कार्य करत आहे.त्यामुळे जनमानसात रोटरी बद्दल आपुलकी वाढत आहे.26 जलै हा दिवस कारगील विजय दिन म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो.याच दिवशी सन 1999 साली भारताने पाकिस्तानवर विजय प्राप्त केला होता.या ऐतिहासिक घटनेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने सांगोला रोटरी क्लबने शहर व तालुक्यातील जवानांना निमंत्रित करुन समारंभपूर्वक त्यांचा सन्मान केला.प्रमुख पाहुणे डॉ.प्रभाकर माळी यानी जवानांची कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या मुळे देश सुरक्षित असल्याची आठवण करुन दिली.
सुभेदार भाऊ निमग्रे यानी कारगील युद्धातील आठ्वणी सांगून उपस्थिताना प्रेरित केले.रो.माणिक भोसले यानी कारगील युद्धातील माहितीची ध्वनीफित ऐकवुन वातावरण निर्मिती केली.रो.एड.गजानन भाकरे यानी वीर जवानाना अभिवादन करुन त्यांच्या कार्याची महती सांगीतली.
या कार्यक्रमात कैप्टन रावसाहेब साळुंखे,वॉरंट ऑफिसर उत्तम चौगुले,,हवालदार आनंदा व्हटे,सुभेदार रेवण पाटील,सुभेदार भाऊ निमगरे ,सुभेदार भारत मोरे, सुभेदार शहाजी कफने,सुभेदार दत्ता खांडेकर यांचा सन्मान करण्यात आला.सोनंद येथील शहीद जवान सुरेश देशमुख यांचे वीरपिता श्री आप्पासहेब देशमुख यानी संदेश पाठविला होता.त्यांनाही रोटरी चे सन्मान चिन्ह देण्यात आले.
अध्यक्ष रो.इंजि.विकास देशपांडे यानी प्रास्ताविक करताना सांगितले की रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संघटना असुन जवान व देशभक्त परिवारास नेहमीच सन्मान देत असते. कारगिल युद्धाची पार्श्वभूमी सांगून भारतीय सैन्याने दाखवलेले अतुलनीय शौर्य, वीरता व साहस त्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे असे सांगून भारतीय सैन्य दला बद्दल आदर व्यक्त केला.
सचिव रो.इंजि.विलास बिले यानी आभार प्रदर्शन केले.रो.हमिद शेख यानी सुत्रसंचालन केले.सदर कार्यक्रम सांगोला अर्बन बँकेतील सभागृहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास सांगोला अर्बन बँक सांगोला व अधिकारी श्री.शिवगुंडे साहेब यांचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमास रो.इंजि.अशोक गोडसे,रो.इंजि.संतोष भोसले,रो.सुरेशआप्पा माळी,रो.निसार इनामदार,रो.संतोष गुळमिरे,रो.माणिकराव भोसले,रो.डॉ.अनिल कांबळे,रो.डॉ. मच्छिंद्र सोनलकर,रो.एड.सचिन पाटकुलकर,रो.महेश गवळी,रो.श्रीपती आद्लिंगे,रो.दत्तात्रय पांचाळ,रो.शरणाप्पा हळ्ळीसागर,रो.प्रा.राजेंद्र ठोंबरे,रो.प्रा.महादेव बोराळकर,रो.प्रा.भगवंत कुलकर्णी,रो.अरविंद डोंबे आदि सद्स्य उपस्थित होते.