*शिक्षण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी इको क्लब विविध कार्य व वृक्ष संगोपनाची जागृती*

नाझरा(वार्ताहर):- शिक्षण सप्ताह च्या आजच्या सहाव्या दिवशी नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये इको क्लबच्या माध्यमातून व हरित सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे विविध गट स्थापन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी आणलेल्या वृक्षांचे रोपण परिसरातील विविध घरांसमोर जाऊन करण्यात आले.माता पालक यांच्या माध्यमातून केलेल्या वृक्षारोपणात संगोपनाची जबाबदारी काय असते याबाबत शिक्षकांकडून व विद्यार्थ्यांकडून माहिती देण्यात आली. शालेय परिसर,घराच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी अशा 40 वृक्षांचे रोपण करण्यात आले. पालकांमध्ये वृक्ष संगोपनाची जागृती व्हावी यासाठी विविध प्रकारच्या फलकांद्वारे परिसरातून फेरी काढण्यात आली.
पालकांनी लावलेल्या विविध वृक्षांना नावे देण्यात आली.त्या नावांच्या माध्यमातून वृक्ष संगोपनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.प्रशालेत हरित सेना विभागाचे प्रमुख सोमनाथ सपाटे यांनी मुख्याध्यापक बिभिषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा उपक्रम राबवला.