सांगोला विद्यामंदिर परिवारातील सेवानिवृत्त शिक्षक एस.के.चाकूर यांचे निधन.

सांगोला- सांगोला विद्यामंदिर प्रशालेतून सेवानिवृत्त झालेले सहशिक्षक सिद्धराम काशिनाथ चाकूर यांचे वयाच्या 78 व्या वर्षी शुक्रवार दि.26 जुलै रोजी रात्री ब्रेन हेम्रेजने निधन झाले.ते विद्यामंदीर परिवारात एस.के.सर या नावाने परिचित होते.
विशेष म्हणजे त्यानी संस्थेच्या तिन्ही शाखेत सांगोला,नाझरे व कोळे या ठिकाणी अध्यापन करुन विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक प्राप्त केला होता.सेवानिवृत्तीनंतर ते हड़पसर,पुणे येथे स्थायिक झाले होते.
अक्कल्कोट तालुक्यातील मैन्द्र्गी हे त्यांचे मूळ गाव होते.त्यांच्या पस्चात मुलगा मेघनाद,सून,नातवंडे,पत्नी असा परिवार आहे.