न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण सप्ताहातील इकोक्लब उपक्रम उत्साहात साजरा

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीमध्ये शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला असून सप्ताहाचा सहावा दिवस इकोक्लब व शालेय पोषण आहार दिवस या उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा.डॅा.अशोकराव शिंदे,प्राचार्य प्रा.केशव माने,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध सर,दशरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला गीता गुळमिरे मॅडम यांनी इकोक्लब व शालेय पोषण आहार दिवसाची माहिती सांगितली.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.डॅा.अशोकराव शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले की, Plant4Mother या अभियान अंतर्गत विद्यार्थी, त्यांची माता आणि धरणीमाता यामधील नाते मजबूत होण्यासाठी शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून मानवी आक्रमणामुळे जंगलतोड वाढल्याने वन्यजीव, पशुपक्षी वातावरणाला याला धोका निर्माण झाला आहे. वृक्षतोड हे याचे प्रमुख कारण आहे. परिणामी,अलीकडे मानवाला याचे महत्त्व कळले असून, वृक्षारोपण करण्याकडे अधिकाधिक भर दिला जात आहे.या उपक्रमांतर्गत प्रशालेत विद्यार्थी व माता यांच्या हस्ते विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला. यानंतर दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी इको क्लबची स्थापना करण्यात आली.तसेच विद्यार्थ्यांमध्ये रोपाचे संगोपन करण्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव निर्माण होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.शाळांमधील मिशन लाइफसाठी इको क्लब विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम आणि प्रकल्प करण्यासाठी सक्षम करतात. हा एक मंच आहे ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या पालकांशी आणि परिसरातील समूहांच्या मदतीने पर्यावरणाला अनुकूल व जबाबदार वतर्नशैलीला प्रोत्साहित करतात. इको क्लब हे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील, पर्यावरणविषयक संकल्पना आणि कृती जाणून घेण्यास सक्षम करतात.
सदरच्या उपक्रमासाठी प्रशालेतील वैशाली घोडके मॅडम,गीता गुळमिरे मॅडम,राणी आदलिंगे मॅडम,अनिल पवार सर,सचिन हजारे सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी प्रसिद्धीप्रमुख किरण पवार सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.